नागपूरच्या विवाहितेचे भुसावळातून 60 हजारांचे मंगळसूत्र लांबवले


A mangalsutra of 60 thousand was extended from Bhusawal to a married woman of Nagpur भुसावळ : भुसावळ बसस्थानकातून विवाहितेचे 60 हजारांचे मंगळसूत्र लांबवण्यात आल्याची धक्कादायक घटना 16 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
तक्रारदार मंदाकिनी श्रीकृष्ण चौधरी (72, शिल्पा सोसायटी, मनीष नगर, सरस्वती अपार्टमेंट, नागपूर) या कामानिमित्त भुसावळात आल्यानंतर गावी जाण्यासाठी 16 रोजी बसस्थानकावर आल्या असता दुपारी चार वाजेच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचे 60 हजार रुपये किंमतीचे व 32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. ही बाब लक्षात येताच त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक भूषण उखा जैतकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !