घटस्फोट मागितल्याच्या रागातून तुंबळ हाणामारी : आठ जणांविरोधात गुन्हा


धरणगाव : शहरातील उड्डाण पुलाजवळ कौटुंबिक वादातून हाणामारी झाली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवार, 16 रोजी 8.30 वाजता घडली.

रस्त्यात धारदार शस्त्राने चढवला हल्ला
आशिष देविदास महाले (36 रा. सातपूर नाशिक) यांची पत्नी त्यांच्यापासून घटस्फोट मागत आहेत. यातून दोघे परीवारामध्ये वाद सुरू आहेत. रविवार, 18 डिसेंबर 2022 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाण पुलाजवळ आशिष यांच्या सासरकडील नंदू श्रीधर महाजन, यश नंदू महाजन, भगवान श्रीधर महाजन,कैलास श्रीधर महाजन,यश नंदू महाजन यांचे मित्र व दोन महिलांनी त्यांना मारहाण केली तसेच रस्त्यात अडवुन अश्लिल शिवीगाळ करुन तुला आज येथेच संपवून टाकू, अशी धमकी दिली. तर भगवान महाजन याने त्याच्या पिशवीतून काही तरी धारदार चाकु सारखे शस्त्र काढून आशिषच्या मानेवर दुखापत केली. तर यश महाजन याने त्याचे हातातील लोखंडी रोडने डोक्याचे मागच्या भागावर मारुन दुखापत केली. तसेच त्याच्या इतर मित्रांनी अश्लिल शिवीगाळ केली. कुणी तरी आपल्या खिश्यातील 33 हजार 700 रुपये व हातातील सोन्याची अंगठी व संमसंग -20 मोबाईल कोणी तरी काढून घेतला, असेही आशिष महाले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !