चाळीसगावात चारचाकी अडवत एकाला लुटले : संशयीत जाळ्यात


A man was robbed by blocking a four-wheeler in Chalisgaon : suspected in a trap चाळीसगाव : चारचाकी गाडी अडवून एकाला मारहाण करत त्याच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी जबरीने लुटली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच संशयीतांना अटक करण्यात आली.

रस्ता अडवत केली लूट
सुधाकर नारायण राठोड (45, रा.हनुमान वाडी चाळीसगाव) हे दि,18 डिसेंबर रोजी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आपली चार चाकी महेंद्रा थार कंपनीची काळया रंगाची क्रमांक (चक-15-कध-7327) हीने शहरातून दुध सागर मार्गाने जात होते. सुर्यादय अपार्टमेंटच्या बाजुला असलेल्या वापरत्या रस्त्यावर शेखर गवळी उर्फ गंग्या (रा.चाळीसगाव) आणि त्याच्यासोबतच्या 3 अनोळखी इसमांनी गाडी अडवली. त्यानंतर सुधाकर राठोड यांच्या डोळयावर गंग्याने फटका मारुन त्यांच्या गळ्यातील 5 तोळे वजनाची सोन्याची चैन जबरीने तोडून नेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना त्याब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलिीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !