धक्कादायक ! : आरपीएफमधील पतीसह प्रेयसीकडून जळगावातील विवाहितेलाच ठार मारण्याची धमकी


जळगाव : आरपीएफमधील पतीने आपल्या प्रेयसीसोबत पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात पतीसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह प्रेयसीविरोधात गुन्हा
जळगावातील पीडीत विवाहितेच्या तक्रारीनुसार, पती प्रमोद छबुलाल सांगळे (रा. कसारा, आरपीएफ कार्यालय) याचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. याबाबत आपल्या माहिती झाल्यानंतर संबंधित महिलेने फोनवरून तुझी मुलगी कोणत्या रीक्षाने कोणत्या शाळेत जाते याची मला माहिती आहे. ती शाळेतून घरी परत येणार नाही, अशी वारंवार धमकी दिली तसेच माझ्या नांदी लागली तर तुझी वाट लावून टाकेल, अशी देखील धमकी दिल्याचे देखील विवाहितेने म्हटले आहे. पती प्रमोद सांगळे याने देखील व्हॉटसअ‍ॅपवर मॅसेज करून तू कितीही कम्प्लेंट कर, माझे काहीही होणार नाही. मी तुझे आणि मुलांचे तुकडे तुकडे करणार आहे. तू माझ्या रस्त्यातील मोठा काटा आहेस, तुला हटवावेच लागेल, अशी धमकी दिल्याचे विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला नाईक स्वप्नाली सोनवणे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !