विवाहितेवर बलात्कार करीत अश्लील फोटो व्हायरलची धमकी : आरोपीला बेड्या


नाशिक : अंबड पोलिस ठाणे हद्दीत विवाहितेवर पतीला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आला तर अश्लील फोटो काढून व्हायरलचीही धमकी देण्यात आली. पीडीतेच्या तक्रारीनंतर आरोपीला टअक करण्यात आली.

महिलेच्या घरी जावून केला अत्याचार
पीडित महिला कामावर असताना संशयित आरोपी याने तिला एका चिठ्ठीवर त्याचा मोबाईल नंबर लिहून दिला आणि तू मला फोन कर असे सांगितले. याबरोबरच फोन केला नाही तर मी तुझ्या पतीला मारून टाकेल अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित महिलेने आरोपीस फोन केला. तेव्हा फोनवरुनच संशयिताने या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. यावेळी नकार दिला तर पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर तो ही मागणी वारंवार करत होता. पण, त्यानंतर त्याने थेट महिलेचे घर गाठले व तिला धमकावून बलात्कारा केला. यावेळी तिचे नग्न अवस्थेत फोटो काढले व घडलेल्या या प्रकाराची माहिती कोणाला दिली तर पतीला जीवे मारेल अशी धमकी देत तो निघून गेला. मात्र पुन्हा दुसर्‍या दिवशी संशयीत आरोपीने तक्रारदार महिलेच्या घरी येऊन शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी केल्यानंतर पीडितेने पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !