चाळीसगावात भर दिवसा भामट्या महिलांनी सात लाखांची रोकड लांबवली
चोरट्या महिलांची छबी सीसीटीव्हीत कैद : घर बांधकामासाठी आणलेले पैसे लांबवले
In Chalisgaon, the women of Bhamta extended seven lakhs in cash throughout the day चाळीसगाव : तोंडाला रूमाल बांधून आलेल्या दोन महिलांनी भर दिवसा शहरातील एका घरातून सात लाखांची रोकड लांबवल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीवरून चोरट्या महिलांचा शोध सुरू करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील नेताजी चौकातील कामगार भवन समोर गुरुवार, 22 रोजी दुपारी बारा वाजेच्या ही घटना घडली.
एकीने दिला घराबाहेर पहारा
कामगार भवनासमोरील रहिवासी सुशीलाबाई अमृत जोशी (73) या घरात एकट्याच राहतात. गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता त्या घराच्या मागील दरवाजाला कुलूप लावून घाटरोड परीसरात मसाला घेण्यासाठी गेल्या असता दुपारी 12 वाजेच्या सुमारास घरी परतल्यावर शेजारी राहणारी भक्ती गवळी या मुलीने सांगितले की, आजी तुम्ही बाहेर गेल्यावर साडेअकरा वाजेच्या सुमारास अंदाजे 25 ते 27 वयाच्या दोन महिला तोंडाला रुमाल बांधून घराजवळ आल्या होत्या. त्यापैकी एक महिला बाहेर थांबली तर एक महिलेला घरात जातांना बघितल्याचे सांगितले.


घराच्या बांधकामासाठी आणले होते मुलीकडून पैसे
सुशीलाबाई यांनी घरात जाऊन बघितले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी बेडमध्ये ठेवलेले सात लाख रुपये जागेवर नव्हते. विशेष म्हणजे घरातून जाताना अज्ञात महिलांनी आतून बंद असलेला मुख्य दरवाजा उघडला होता. दोन्ही महिलांना परीसरातील रहिवाशांना जाताना व येताना पाहिले आहे. सुशिलाबाई यांची मुलगी सुनिता नीलेश गोसावी (रा. मालेगाव) यांच्या घराच्या बांधकामासाठी, त्यांची दुसरी मुलगी प्रतिमा राजु बुवा (रा.धुळे) यांच्याकडून सात लाख रुपये आणलेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक के.के. पाटील आणि त्यांचे सहकार्यांनी धाव घेतली
रीक्षा चालकाचीही चौकशी !
याबाबत शहर पोलिसात सायंकाळी दोन अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परीसरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात त्या दोन महिला रीक्षातून आल्याचे आढळल्यानंतर रीक्षा चालकाला बोलावून माहिती घेण्यात आली. दोन अज्ञात महिलांपैकी एका महिलेने पिवळ्या रंगाचा फुल बाह्यांचा टॉप व काळी जीन्स, तर दुसर्या महिलेने काळ्या रंगाची पँट व काळ्या रंगाचा टॉप परीधान केला होता, सोबत काळ्या रंगाची बॅग होती. दोन्ही महिलांना सिग्नल पॉइंटवर सोडल्याचे रीक्षा चालकाने सांगितले.