चोरट्यांचा मोर्चा पशूधनाकडे : अनोरे शिवारातून 75 हजारांची गुरे चोरीला


Thieves march towards livestock : Cattle Worth 75 Thousand Were stolen from Anore Shiwar धरणगाव : चोरट्यांनी मोर्चा आता गुरांकडे वळवला असून धरणगाव तालुक्यातील अनोरे शिवारातून 75 हजारांचे पशूधन लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
20 डिसेंबर ते 21 डिसेंबरच्या दरम्यान, प्रमोद भीमराव पाटील (रा.गारखेडे) यांच्या अनोरे शिवारातील शेत गट क्र. 25 मधील शेतातील निंबाच्या झाडाखालून अज्ञात चोरट्यांनी दोन गाय, गोर्‍हा, वगार असे 75 हजाराचे पशुधन चोरून नेले. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक चंदूलाल सोनवणे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !