धुळेपाडा आदिवासी वस्तीवरील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Suicide Attempt Of Young Man At Dhulepada Tribal settlement यावल : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या धुळेपाडा आदिवासी वस्तीवरील एका 18 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
उपचारानंतर प्रकृती स्थिर
धुळेपाडा ही सातपुड्याच्या कुशीत आदिवासी वस्ती आहे. या वस्तीवर सुकलाल भिलाला हे कुटुंबासह राहतात व त्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यांच्या या व्यसनाला कंटाळून त्यांचा 18 वर्षीय मुलगा प्रकाश सुखलाल भिलाला याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, डॉ.वैशाली निकुंभ, अधिपरीचारीका आरती कोल्हे, सुमन राऊत आदींनी त्याच्यावर उपचार केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

