अमळनेर शहरात दोन लाख तीस हजारांचा गांजा पकडला : तस्करांमध्ये उडाली खळबळ


अमळनेर : अमळनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन लाख तीस हजार रुपयांचा गांजा जप्त करत एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अमळनेर बसस्थानक परीसरातून दोन व्यक्ती हे बेकायदेशीररित्या गांजाची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र कोठावदे, किशोर पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील, मिलिंद भांबरे, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत शिसोदे, पोकॉ हर्षल पाटील, विलास बागुल यांनी गुरूवार, २२ डिसेंबर रोजी रात्री अमळनेर बसस्थानक परिसरात छापा टाकून सुमारे २ लाख ३० हजार रुपये किमतीचा १५ किलो ५६६ ग्रॅम वजनाचा ओला गांजा जप्त केला आहे.



या कारवाईत राधेश्याम रामसिंग पावरा (रा. हिसाडे, ता.शिरपूर) याला ताब्यात घेतले तर दुसरा साथीदार सुरेश साहेबराव भदाणे (रा. हिसाळे, ता.शिरपूर) पसार झाला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील राधेश्याम पावरा या आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !