डांभुर्णी शेत शिवारात विद्युत तार तोडून नुकसान


यावल : तालुक्यातील डांभुर्णी शेतशिवारामध्ये अज्ञात चोरट्यांनी महावितरण कंपनीचे विद्युत तार चोरी करण्याच्या उद्देशाने तोडले यात तब्बल २५ हजाराचे नुकसान झाले आहे व शेतकऱ्यांचा शेताचा वीज पुरवठा देखील खंडित झाला. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.

वीजपुरवठा देखील झाला खंडित
डांभुर्णी, ता.यावल येथील किनगाव रोडवरील शेत गट क्रमांक ९६ मध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीचे शेती पंपा करीता कनेक्शन देण्या करीता विद्युत खांब आहे व त्या खांब्यांवर विद्युत तार टाकून कनेक्शन देण्यात आले आहे. तेव्हा या खांबावरील तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करण्याच्या उद्देशाने तोडले. यामध्ये विद्युत वितरण कंपनीचे तब्बल २५ हजाराचे नुकसान झाले. यात तार तर तुटलेच सोबत शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला. हा प्रकार निदर्शनास येताच वरीष्ठ तंत्रज्ञ हबीब तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अद्यात चोरट्याविरुद्ध नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !