आडगाव येथे म्हशी चोरीचा प्रयत्न फसला
यावल : तालुक्यातील आडगाव येथे अज्ञात चोरट्यांचा म्हशी चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे. गावातील खळ्यातुन दोन म्हैशी चोरी झाल्या मात्र या दोन्ही म्हैशी त्यांना नेता आल्या नाही व शेत शिवारात दोन्ही म्हशी सोडून चोरटे पसार झाले.
वाढत्या चोऱ्यांमुळे पशुपालक भयभीत
खळ्यातुन चोरी झालेल्या म्हशी शेतशिवारातून मिळून आल्या आहे. असे असले तरी पोलिसांनी ग्रामिण भागात रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
आडगाव, ता.यावल येथील शेतकरी मनोहर पुंडलिक पाटील यांच्या खळ्यात त्यांनी आपल्या म्हशी बांधुन ठेवल्या होत्या शुक्रवारी सकाळी जेव्हा ते दुध ओढण्या करीता खळ्यात गेले असता तेथे म्हशी नव्हत्या तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली व गावासह शेत परीसरात म्हशींचा शोध सुरू केला.


पहाटे चोरीच्या उद्देशाने लांबवलेल्या म्हशी सायंकाळी आडगाव शेतशिवारात मिळुन आल्या आहे. एकुणच खळ्यातुन म्हैशी चोरट्यांनी चोरून नेल्या मात्र, त्यांना शेत शिवारातुन म्हशी पुढे नेणे शक्य झाले नाही म्हणुन शेतात सोडून चोरटे पसार झाले तेव्हा म्हैशी जरी सापडल्या असल्या तरी शेतकऱ्यांची पशुधनाची होणारी चोरी पाहता रात्री ग्रामिण भागात पोलिसांनी गस्त सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.