शिरसगावात दोन धाडसी घरफोड्या : पाच लाखांच्या ऐवजावर डल्ला
Two daring house burglaries in Shirasgaon : Dalla on a ransom of five lakhs चाळीसगाव : तालुक्यातील शिरसगाव गावातील दोन घरांना चोरट्यांनी टार्गेट करीत पाच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन बंद घरातून किंमती ऐवज लांबवला
चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील दोघा बंद घरांमधून चोरट्यांनी एकून पाच लाख 40 हजारांचा ऐवज लांबवला. 22 ते 24 डिसेंबरच्या कालावधीत ही चोरी झाली. शिरसगाव येथील विजय केशवराव चव्हाण आणि नंदलाल नामदेव शेवाळे या दोघांच्या बंद घरातून ही चोरी झाली. विजय चव्हाण यांच्या बंद घरातून 20 हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजनाच्या एकूण दहा अंगठ्या, 9 हजार रुपये किंमतीचा दोन ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का, एक हजार रुपये किंमतीचे दोन चांदीचे देव, 10 हजार रुपये किंमतीच्या 25 साड्या आणि नंदलाल शेवाळे यांच्या घरातून पाच लाखांची रोकड लांबवण्यात आली.


अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला गु.र.न. 280/22 भा.द.वि. 454, 457,380 नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.