पारोळ्याजवळ सुरू होता बनावट दारूचा कारखाना : छापेमारीत दिड कोटींचा मुद्देमाल जप्त ; 22 संशयीतांविरोधात गुन्हा
A fake liquor factory was being started near Parola : goods worth half a crore were seized in the raid ; Crime against 22 suspects पारोळा : नववर्षाच्या स्वागतापूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू कारखान्यावर छापेमारी केली असून 22 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करीत सुमारे दिड कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने बनावट मद्य निर्मिती करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने कारवाई केली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक या पथकाने शनिवार, 24 डिसेंबर रोजी पारोळा नगरपरीषद हद्दीतील धुळे-नागपूर महामार्गालगत असलेल्या गट नं. 181 मधील प्लॉट नं.1,2 व 3 या मिळकतीमध्ये असलेल्या पत्र्याच्या गोडावूनमध्ये छापा टाकत बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला.


दीड कोटींचे साहित्य जप्त
पथकाने रॉकेट देशी दारु संत्रा ब्रँडचे 37 हजार 00 बनावट जिवंत पत्री बुचे, देशी दारु दारु टँगो पंचचे चार हजार बनावट जिवंत पत्री बुच, रॉकेट देशी दारु संत्रा ब्रँडचे एक लाख 55 हजार 500 बनावट कागदी लेबल, देशी दारु दारु टँगो पंचचे 60 हजार बनावट कागदी लेबल, एक आर. ओ मशीन, 90 मि.ली क्षमतेच्या 24 हजार 220 रीकाम्या बाटल्या, 800 लिटर सीटोन सदृष्य द्रावण, रबरी नळी, पाण्याचे माटर, 200 लिटर क्षमतेच्या 24 प्लास्टिक ड्रम स्पिरीट वासाचे, 350 फुट लांबीची वायर, प्लास्टिक ट्रे- 100 नग, नऊ मोबाईल संच तसेच
एक दहा चाकी टाटा कंपनीचा ट्रक, एक सहा चाकी आयशर कंपनीचा ट्रक असा एकूण 1 कोटी 64 लाख 162 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
22 जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी संशयीत महेश संभाजी पाटील (जवखेडे, ता.अमळनेर), सुदामगीर भुरागीर गोसावी (भाटपूरा, ता.शिरपूर), प्रेमसिंग रतन जाधव, (रोहिणी, ता.शिरपूर), नरेंद्र मधुकर पाटील (गुढे, ता.भडगाव), राजू रतन जाधव (धवली, ता.वरला, जि.बडवानी), प्रदीप ईस्मल पावरा (मोहिदा, पो.पळासनेर, ता.शिरपूर), दीपक गुलाब पावरा (दुधखेडा, ता.वरला, जि.बडवानी), रंजीत निंबा पावरा (गधाडदेव, पो.मालकात्तर, ता.शिरपूर), प्रताप चंदरसिंग पावरा (मोहिदा, पळसनेर, ता.शिरपूर) सतीश अबला पावरा (मोहिदा, पळासनेर), प्रकाश बदा पावरा (मोहिदा, पळासनेर), राकेश कंदरसिंग पावरा (मोहिदा, पळासनेरख ता.शिरपूर), दयाराम नहालसिंग बारेला (धवर्ला, ता.वरला, जि.बडवानी (मध्यप्रदेश), रामगीर भुरागीर गोसावी (भाटपूरा, ता.शिरपूर), भीमसिंग बदा चव्हाण (तांडा, पो.धवर्ला, ता.वरला, जि.बडवानी), सुरेश श्रावण राठोड (रोहिणी, ता.शिरपूर), निलेश नुरजी पावरा (मोहिदा, पो.पळासनेर, ता.शिरपूर), समाधान लोचन चौधरी (मुख्य संशयीत फरार), राहणार-पारोळा, ता. पारोळा जि. जळगांव,19) सुधाकर भास्कर पाटील (संशयीत फरार), राहणार – वर्धमान नगर, उंदीरखेडारोडा, ता. पारोळा, जि. जळगाव,20) प्रदिप आनंदा पवार (पसार, आर.एल.नगर, अमळनेर रोड, ता.पारोळा, जि. जळगाव), राहुल अहिरराव (संशयीत फरार, मु. पो.धुळे) तसेच वॉण्टेड जप्त वाहन क्रमांक एम.एच.18 एम.3837) व एम.एच.18 बी.जी.9823) चे मालक तसेच मद्य विकत घेणारे, मद्यार्क (स्पिरीट) पुरवठादार ज्ञात-अज्ञात व गुन्ह्याशी संबधीत इतर संशयीत पसार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, सुनील चव्हाण, संचालक (अं. व द) महाराष्ट्र राज्य, मुंबई, उपायुक्त अर्जुन ओहोळ, जळगाव अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस.चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही.एम.पाटील, अ.गो.सराफ, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर यांच्यासह जळगाव भरारी पथक निरीक्षक सी.एच.पाटील व त्यांचा स्टाफ तसेच धुळे भरारी पथक निरीक्षक दिंडकर व त्यांचा स्टाफ तसेच धुळे ग्रामीण दुय्यम निरीक्षक पी.बी.अहिरराव व त्यांचा स्टाफने केली. तपास नाशिक भरारी पथक निरीक्षक ए.एस.चव्हाण व सहकारी करीत आहेत.