भुसावळ शहरासह तालुक्यातून महागड्या दोन दुचाकींची चोरी

चोरटे सैराट : भुसावळ शहर व तालुक्यात दुचाकी चोरी करणारे रॅकेट सक्रिय


Theft of two expensive two wheelers from Bhusawal town and taluka भुसावळ  : शहर व तालुक्यात दुचाकी चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाले असून वाढत्या वाहनांच्या चोर्‍यांमुळे वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिस प्रशासन दुचाकी चोर्‍या रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे. साकेगावसह भुसावळातून पुन्हा दुचाकींची चोरी झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

वाढत्या चोर्‍यांना वाहनधारक वैतागले
भानखेडा येथील उत्तम शिवराम पाटील यांनी तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवार, 20 रोजी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान साकेगाव येथील मराठी शाळेजवळील सर्विस रोडवर त्यांनी 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 ए.एल.3394) लावली असता चोरट्यांनी संधी साधली. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.



भुसावळातून दुचाकी लंपास
भुसावळातील जयंत भास्कर पाटील (52, निवृत्ती नगर) यांच्या तक्रारीनुसार, दत्त नगरातील गजानन महाराज मंदिराजवळून चोरट्यांनी त्यांची 15 हजार रुपये किंंमतीची दुचाकी (एम.एच.19 बी.ई.2590) गुरुवार, 22 रोजी सकाळी आठ ते एक वाजेदरम्यान लांबवली. तपास हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !