कोरपावली शिवारात 50 वर्षीय इसमाला सर्पदंश, प्रकृती गंभीर
50-year-old Ismala snakebite in Korpavali Shivar, Critical Condition यावल : तालुक्यातील कोरपावली शेत शिवारात काम करत असतांना एका 50 वर्षीय इसमाला सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जळगाव हलवण्यात आले. सुनील प्रेमचंद नेहेते (50) असे सर्पदंश झालेल्या इसमाचे नाव आहे.
प्रकृती अत्यंत गंभीर
सुनील नेहेते हे कोरपावली येथील शेत-शिवारात काम करीत असताना यांच्या उजव्या हाताच्या बोटाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, डॉ.मयूर चौधरी, डॉ.ईरफान खान, अधिपरीचारीका ज्योत्स्ना निंबाळकर, सुमन राऊत, कादर तडवी आदींनी प्रथम उपचार केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

