परधाडे रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखीचा मृत्यू
A stranger died after being hit by a moving train near Pardhade railway station पाचोरा : कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली आल्यानंतर अनोळखीचा मृत्यू झाला. पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक ही घटना घडली. अनोळखीचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.
मयताची ओळख पटवण्याचे आवाहन
परधाडे रेल्वे स्थानकानजीक किलोमीटर खांबा क्रमांक ३६७/११ डाऊन लाईनजवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली आल्याने ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू ओढवला. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक तुषार विसपुते हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या सोबत घटनास्थळी दाखल झाल्यारनंतर मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. असून मयताच्या नातेवाईकांचा शोध पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल भगवान बडगुजर घेत आहेत.

