यावलला मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबिर
यावल : यावल ग्रामीण रुग्णालयात मंगळवार, २७ डिसेंबरपासून चार दिवस मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबिर सुरू होत आहे. या शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या आणि मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असून या शिबिरात तपासणीसाठी नाव नोंदणी यावल, न्हावी ग्रामीण रुग्णालयासह यावल तालुयातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे. शिबिराचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांनी केले आहे.
यांच्या उपस्थितीत शुभारंभ
यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय, जळगाव यांच्या वतीने राज्य आरोग्य सोसायटी महाराष्ट्र शासन अंतर्गत आदिवासी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी २७ डिसेंबरपासून चार दिवस मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबिर होत आहे. या शिबिरास मंगळवार, २७ रोजी सुरवात होईल. या शिबिराचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार शिरिष चौधरी, खासदार रक्षा खडसे, चोपडा आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते होईल. या प्रसंगी जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख, तहसीलदार महेश पवार यांची उपस्थिती राहणार आहे.

