ठाणे जिल्ह्यातील अल्पवयीन बालिकेचा विवाह : दसनूरच्या पतीसह तिघांविरोधात गुन्हा
Marriage of minor girl in Thane district : Case against three including Dasanur’s husband सावदा : ठाणे जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी रावेर तालुक्यातील दसनूर येथील पतीसह तिघांविरोधात सावदा पोलिस ठाण्यात पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली असून बालविवाहाचा जटील प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. साक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर आणि अशोक दिलीप पाटील (सर्व रा.दसनूर ता. रावेर जिल्हा जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
ठाणे जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार, 6 नोव्हेंबर 2022 रोजी मला नवरी बनवून दुपारी तीन वाजता संशयीत आरोपी व पती अशोक दिलीप पाटील (रा.छोटा वाघोदा, ता.रावेर, जि.जळगाव) यांच्या सोबत जबरदस्तीने लग्न लावले. त्यानंतर 7 नोव्हेंबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 रोजी पावतो अशोक पाटील यांनी कोणतीही जबरदस्ती केली नाही परंतु वयाने लहान असताना पती अशोक पाटील यांनी माझ्याशी लग्न केले व यासाठी साक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर (रा. दसनूर ता. रावेर), अशोक दिलीप पाटील यांच्या इतर नातेवाईकांनी लग्न लावण्यास मदत केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार विजय पोहेकर हे करीत आहेत.

