खिर्डीत गोरगरीबांना हक्काचे घर मिळणार कधी ?


खिर्डी : रावेर तालुक्यातील खिर्डी येथील गोरगरीब लोकांना हक्काचे घरे मिळणार कधी ? असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजना गोरगरीब लोकांसाठी स्वप्नच ठरत आहे. 2020-21 या वित्तीय वर्षामध्ये खिर्डी खुर्द येथील रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना प्रपत्र ड यादी मध्ये 241 लोकांचे नाव ऑगस्ट महीन्यात रावेर पंचायत समितीमध्ये ऑनलाइन स्वरूपात पाठवण्यात आले असलेतरी या घरकुल प्रस्तावावर शासनाकडून उद्दिष्ट मात्र मागविण्यात येत नसल्यामुळे लाभार्थीमध्ये तीव्र संताप व्यक्त हाते आहे.

योजनेला गती देण्याची अपेक्षा
सध्या कडाक्याची थंडी पडत असून गोरगरीबांना हक्काचे छत नसल्याने लाभार्थींचे चांगलेच हाल होत आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी 241 प्रस्तावापैकी एस.सी व एस.टी.असे आठ व इतर चार तसेच रमाई घरकुल योजना पाच सतरा पात्र प्रस्ताव/उद्दीष्ट मागविण्यात आले होते. बाकीचे 224 उद्दीष्टांना चालना कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने प्रधानमंत्री घरकुल योजनेला गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !