गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत : आरोपी अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात
Panic at gunpoint in village : Accused in Amalner police net अमळनेर : गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या संशयीताच्या अमळनेर पोलिसांनी मुसक्या बांधत त्याच्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. अविनाश बाळू शिरसाट (26, वाडी बुद्रुक, ता.शिरपूर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
अमळनेर शहरातील पैलाड भागातील चोपडा रोडवर असलेल्या वर्णेश्वर महादेव मंदिर परीसरात एक तरुण हातात गावठी बनावटीचे पिस्तूल, चाकू, फायटर असे घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर, किशोर पाटील, पोलिस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील सिद्धांत शिसोदे, शरद पाटील यांनी कारवाई करत संशयीत आरोपी अविनाश बाळू शिरसाट (26, रा. वाडी बुद्रुक, ता.शिरपूर, जि.धुळे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीचा पिस्तूल चाकू, फायटर, दोन मोबाईल असा एकूण 27 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक शरद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी अविनाश शिरसाट याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.