जळगावातून एकाची दुचाकी लंपास


One bike Theft From Jalgaon जळगाव : शहरातील भवानीपेठ परीसरातून एकाची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवण्यात आली. याबाबत मंगळवार, 27 डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांवर शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
अनिल दुल्लभ पाटील (58 रा.सूर्या सॉ मीलच्या पाठीमागे, भवानी पेठ, जळगाव) हे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडील दुचाकी (एम.एच.19 बी.डी.5140) सोमवार, 26 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घराबाहेरून अज्ञात चोरट्याने लांबवली. मंळवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय मराठे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !