अमळनेर शहरातील 14 वर्षीय मुलीला फूस लावून पळविले
A 14-year-old girl from Amalner city was lured and abducted अमळनेर : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी अमळनेर पोलिसात मंगळवारी सायंकाळी पाच गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
अमळनेर शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. सोमवार, 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजेच्या दरम्यान गावातील विजय बारकू भिल याने अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले, असा संशय मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. या संदर्भात मुलीच्या आईने अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी विजय बारकू भिल याच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

