अमळनेरच्या बोरी काठावर अनोळखीचा मृतदेह आढळला
The body of an unknown person was found on the bank of Amalner अमळनेर : बोरी नदीच्या काठावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मयताचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष असून मृताच्या अंगात निळसर पांढर्या रंगाचे लाईनिंगचे फूल शर्ट व निळ्या रंगाची फूल पॅन्ट आहे. याप्रकरणी मारवाड अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मारवाड पोलीसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.