जळगावातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
The thieves stole the bike from Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील आनंद नगर परीसरातील श्री स्वामी समर्थ केंद्राच्याजवळ उभी दुचाकी चोरून दिल्याप्रकरणी बुधवार, 28 डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामानंद पोलिसात गुन्हा
जळगाव शहरातील मोहाडी रोड परीसरातील आनंदनगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ गजानन प्रभाकर सोनार (50) हे वास्तव्यास आहेत. सोनार यांनी गुरुवार, 22 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या स्वामी समर्थ केंद्राजवळ उभी केली होती. दुसर्या दिवशी शुक्रवार, 23 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उभी केलेली दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने अखेर पाच दिवसानंतर गजानन सोनार यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहेत.

