धक्कादायक ! : धुळ्यात मुख्याध्यापिकेकडेच शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी


Shocking! : In Dhule, the teacher demanded physical comfort from the headmistress धुळे : देशाची पिढी घडवणार्‍या शिक्षकानेच आपल्या सहकारी महिला मुख्याध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात घडला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अखेर पोलिसात तक्रार दाखल
धुळ्याील एका भागातील रहिवासी असलेल्या 43 वर्षीय महिला मुख्याध्यापिकेच्या तक्रारीनुसार आरोपी शिक्षक अन्सारी अबुजर मक्सुद अहमद (रा.कबीर गंज, वडजाई रोड,धुळे) हा त्याच शाळेत कार्यरत असून त्याने मुख्याध्यापिकेच्या वारंवार मागे लागून शरीरसुखाची मागणी केली व धमकी दिली तसेच कारण नसतांना मुख्याध्यापिकेच्या पतीला शिवीगाळ करण्यात आली. आरोपी शक्षक अन्सारीविरोधात भादंवि 354 (अ), 354 (ड), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आर.एन.जाधव करीत आहेत.


कॉपी करू नका.