जळगाव शहरातील रस्ते टाकणार कात : 200 कोटीतून होणार कामे
200 crores fund will be available for roads in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील रस्त्यांसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा निर्णय झाला असून यातून रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.धी मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
यांची बैठकीला उपस्थिती
मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने काल जळगावातील रस्त्यांच्या प्रश्नावर मुंबईत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे उपस्थित होते.

सहा महिन्यात मिळणार निधी
या बैठकीत जळगावातील रस्त्यांसाठी 200 कोटी रूपये मिळावे अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. याला या बैठकीत मान्यता मिळाली असून येत्या सहा महिन्यांमध्ये हा निधी मिळणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.