उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत बेकायदेशीर व बोगसरीत्या केले बदल : अ‍ॅड.महेश जेठमलानींचा दावा


Uddhav Thackeray made illegal and extortionate changes in the party constitution: Adv. Mahesh Jethmalani’s claim नवी दिल्ली : शिवसेना कुणाची अन् धनुष्यबाण कुणाचा याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी घेण्यात आल्यानंतर याबाबत 14 फेब्रुवारी रोजीची तारीख देण्यात आली आहे त्यामुळे आजदेखील शिवसेना कुणाची? हा निर्णय अनिर्णितच राहिला. यावेळी शिंदे-ठाकरे गटाने आयोगासमोर युक्तिवाद केला.

बेकायदेशीररीत्या बदल केल्याचा दावा
शिंदे गटाचे वकील अ‍ॅड.महेश जेठमलानी म्हणाले की. शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब ठाकरें केंद्रीत आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत बेकायदेशीर आणि बोगस बदल केले असा दावा महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर केला. शिवसेनेची जुनी घटना ही बाळासाहेब ठाकरेंभोवती केंद्रित होती. जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून राष्ट्रीय कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी बोगसपणे घटनेत बदल केला. उद्धव ठाकरेंनी स्वत:कडे अधिकार ठेवणे हे बेकायदेशीर आहे. शिवसेना पक्षप्रमुख पद उद्धव ठाकरेंनी स्वत:कडे ठेवले. शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या पदाला अर्थ नाही असं त्यांनी सांगितले.

एक महिना पहावी लागणार वाट
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादानंतरची संत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी थेट व्हॅलेंटाईन डे रोजीच घेण्यात येणार आहे. देशाच्या सरन्यायाधीशांनी ही सुनावणी पुढे ढकलल्याचे सांगितले. त्यावर, दोन्ही गटाच्या वकिलांनी हरकत न घेता, मान्यता दिली आहे. तसेच, ठाकरे गटाच्या श्रज्ञी सदस्य खंडपीठाची मागणी अद्याप मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी ही 5 न्यायाधीशांच्या खंडपीठात होणार की, 7 न्यायाधीशांच्या खंडपीठात याबाबत निश्चिती नाही. मात्र, सत्ता संघर्षाच्या पुढील सुनावणीसाठी अजून ,व महिना वाट पाहावी लागणार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !