धुळ्यानजीक केमिकलने भरलेला टँकर उलटला


Tanker filled with chemicals near Dhule धुळे :शहराजवळील गरताड बारीनजीक हायड्रोजन पॅरोक्साइडची वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडताच टँकरमधून गॅस गळती झाली. ही घटना गरताडबारीनजीक घडी मात्र केमिकल ज्वलनशील नसल्याने मोठी हानी टळली. सुदैवाने अपघातात कोणालाही ईजा झाली नाही.

महामार्गावर केमिकलने भरलेला टँकर पलटला
गुजरात राज्यातील बडोद्याहून (इरीेवर) हैदराबादकडे जात शप असेला टँकर (जी.जे.16 ए.यु.4875) हा गरताडबारीनजकी रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाला. टँकर उलटताच गळती सुरू झाली व धूर निघत असल्याने भीती निर्माण झाली मात्र केमिकल ज्वलनशील नसल्यामुळे मोठी हानी टळली. अपघाताची माहिती मिळतात मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत धुळे महापालिकेच्या अग्निशामक विभागाला पाचारण केले. पाण्याचा मारा करून गळती रोखण्यात आली तसेच टँकर उभे करण्यात आले.


कॉपी करू नका.