Cruiser overturns on Savalde Bridge सावळदे पुलावर क्रुझर उलटली : अपघात टाळण्याच्या प्रयत्नात ट्रक नदीपात्रात कोसळला


Cruiser overturns on Savalde Bridge : In an attempt to avoid an accident, the truck plunged into the river bed शिरपूर : शिरपूर जवळील सावळदे पुलावर भरधाव क्रुझर उलटून झालेल्या अपघातात चौघे मजूर जखमी झाले तर पाठीमागून भरधाव येणारा ट्रक क्रुझरवर आदळणार तोच ट्रक चालकाने जोरात ब्रेक लावल्याने नियंत्रण सुटलेला ट्रक थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, मंगळवारी नदीपात्रात बुडालेल्या ट्रकसह चालकाचा शोध सुरू करण्यात आला असून दीपक कुमार (40, कोटा, राजस्थान) या ट्रक चालकाचे लायसन्स हाती लागले आहे.

भरधाव क्रुझर उलटली
मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून मजुरांना घेऊन येणारी क्रुझर सावळदे तापी नदीवरील पुलावर उलटल्यानंतर या अपघातात सुभाष देवरे (15), विक्रम मोरे (23), संध्या मोरे (4), रल्लू सागर वासकुल (22, सर्व रा.सेंधवा, मध्यप्रदेश) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तर याचवेळी भरधाव वेगाने आलेला ट्रक क्रुझरवर धडकणार तोच चालकाने जोरदार ब्रेक लावल्याने नियंत्रण सुटून तो थेट नदीपात्रात कोसळला. नदीत 40 45 फूट पाणी असल्याने ट्रक पाण्यात बुडाल्याने मंगळवारी शोध कार्य सुरू करण्यात आले. ट्रक चालकासोबत आणखी कोण-कोण होते याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.


कॉपी करू नका.