दौंड तालुक्यात सात जणांच्या मृत्यूनंतर समोर आले हे धक्कादायक कारण


The shocking reason came after the death of seven people in Daund taluka पुणे : भीमा नदीपात्रात एकामागून एक सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर सुरूवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा कयास होता मात्र पोलिसांच्या चौकशीत सातही जणांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले असून मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांचे सामूहिक हत्याकांड घडवून आणल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

या आरोपींना अटक
या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी खून करणार्‍या आरोपी अशोक कल्याण पवार (वय 39), श्याम कल्याण पवार (35), शंकर कल्याण पवार (37) प्रकाश कल्याण पवार (24) व कांताबाई सर्जेराव जाधव (45, रा. ढवळे मळा, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर ) यांना अटक केली आहे. आरोपी मयताचे चुलत भाऊ आहेत.







बदला घेण्यासाठी हत्याकांड
पोलिस तपासात आरोपी अशोक कल्याण पवार यांचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यांपूर्वी वाघोली येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्यामध्ये मयत मोहन उत्तम पवार व त्याचा मुलगा अनिल मोहन पवार हेच जबाबदार आहेत, असा संशय आरोपींना होता. तोच राग त्यांच्या मनात होता. त्या कारणावरून बदला घेण्यासाठी आरोपींनी सामूहिक हत्याकांड घडवून आणले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

मोबाईलवरून लागला शोध
पारगाव येथील भीमा नदीच्या पुलालगत बुधवार (दि. 18) ते रविवार (दि. 22) च्या दरम्यान पोलिसांना सात मृतदेह मिळून आले होते. एकाच वेळी तब्बल सात मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली होती. अनोळखी मयत इसमांच्या नातेवाइकांचा शोध यवत पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण करीत होते. त्यापैकी शुक्रवारी नदीपात्रात मिळालेल्या मयत महिलेजवळ एक मोबाइल सापडला त्यावरून मयतांचे नातेवाइकांचा शोध पोलिसांनी लावला. मयतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला व तीन लहान मुलांचा समावेश होता. मयत मोहन पवार हे पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई, मुलगी राणी, जावई श्याम, नातू रितेश, छोटू, कृष्णा यांच्यासह मुलगा अनिल याच्याबरोबर मागील एक वर्षापासून निघोज, ता. पारनेर येथे राहून मजुरी काम करत होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !