अवघ्या तीनशे रुपये लाचेचा मोह नडला : धुळ्यात कृषी विभागाचा कर्मचारी एसीबीच्या हाळ्यात


empted by bribe of just three hundred rupees : Agriculture department employee in ACB hall in Dhule धुळे : पीएम योजनेच्या फार्म पडताळणीसाठी तीनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या धुळे कृषी विभागातील डेटा ऑपरेटर सुनील रामदास सूर्यवंशी यास धुळे एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने कृषी विभागातील लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

अर्ज पडताळणीसाठी मागितली लाच
नाशिकच्या तक्रारदारची धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथे वडिलोपार्जीत शेत जमीन असून तक्रादाराच्या आई यांना पी.एम.किसान योजनेचा लाभ मिळत होत मात्र 2009 मध्ये ाई मयत झाल्याने सदरचा लाभ मिळणे बंद झाला. याबाबत तक्रादाराने दोन वर्षांपूर्वी अर्ज केला मात्र ऑनलाईन पडताळणीचे काम धुळे तालुका कृषी विभागाकडे देण्यात आल्यानंतर धुळ्यातील डेटा ऑपरेटर सुनील रामदास सूर्यवंशी यांनी तक्रादार यांना फोन करुन कागदपत्रे व्हॉटसअ‍ॅपवर मागितली व काम करून देण्याच्या मोबदल्यात तीनशे रुपयांची लाच मागितली. शुक्रवारी रक्कम स्वीकारताच सूर्यवंशी याां अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
हा सापळत्त धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, भूषण शेटे, प्रशांत बागुल, गायत्री पाटील, संतोष पावरा, संदीप कदम, रामदास बारेला, रोहिणी पवार, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी यशस्वी केला.

 


कॉपी करू नका.