भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या थोर पुरूषांच्या व्यक्तिरेखा

भुसावळ : शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी ते केजीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरीक वेशभूषा साकारत लक्ष वेधले. मुलांनी शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, विनायक दामोदर सावरकर, शहिद भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम आदी भूमिका वठवल्या. विद्यर्थ्थिनींनी सावित्रीबाई फुले, जिजाबाई, झांशीची राणी, इंदिरा गांधी, आदी भूमिका वठवत तशा वेषभूषा साकारल्या. मुख्याध्यापिका नीना कटलर, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
