जळगाव एसीबीची मोठी कारवाई : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह पंटराविरोधात गुन्हा
पंटर जाळ्यात तर रजेवर असलेल्या उपनिरीक्षकाचा एसीबीकडून कसून शोध ः एसीबीच्या कारवाईने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ
गणेश वाघ
Major Action by Jalgaon ACB: Case Registered Against Sub-Inspector and ‘Punter’ at Bhusawal Bazar Peth Police Station भुसावळ (29 मे 2026) : 20 हजारांच्या लाच मागणी प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे व खाजगी पंटर सलीम हकीम कुरेशी (46, कुरेशी मोहल्ला, बोदवड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका गुन्ह्यात अटक टाळून चॅप्टर केस टाळण्यासाठी उपनिरीक्षकाने 30 हजारांची लाच मागून 20 हजारात तडजोड केली मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
असे आहे लाच प्रकरण
भुसावळातील तक्रारदार व त्याच्या मित्राचे एकासोबत 28 मार्च 2026 रोजी खडका चौफुली येथे पाच हजार रुपये मागितल्यानंतर वाद झाले व किरकोळ हाणामारी झाली. त्यानंतर उभयतांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताच्या शोधासाठी घरी गेलेल्या उपनिरीक्षकाने संशयीत व तक्रारदाराच्या पत्नीकडे गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 30 हजारांची मागणी केली व याबाबतची तक्रार तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे 7 एप्रिल रोजी केली.
लाचेची मागणी मात्र संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यात गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे यांनी 30 हजारांची मागणी करून 20 हजारात तडजोड केल्याचे स्पष्ट झाले व सापळा रचण्यात आला मात्र लाच रक्कम देण्यासाठी तक्रारदार गेल्यानंतर संशय आल्याने सापळा यशस्वी झाला नाही मात्र एसीबीकडे बोदवडचा संशयीत व खाजगी पंटर सलीम कुरेशी यांचे संभाषण रेकॉर्ड केले व लाच मागणीचा अहवाल शुक्रवारी आल्यानंतर एसीबीच्या पथकाने खाजगी पंटर सलीम कुरेशी (बोदवड) याला अटक केली तर संशयीत सांगळे हे सध्या सीक रजेवर असल्याने त्यांचा एसीबीने कसून शोध सुरू केला आहे. दोघांविरोधात लाच मिळवण्याचा (डिमांड ट्रॅप) प्रयत्न केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, ग्रेडेड उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अमोल सूर्यवंशी, भूषण पाटील, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने केली.



