धुळ्यात चारीत्र्याच्या संशयातून पत्नीचा खून : आरोपी पतीला अटक


Murder of wife due to suspicion of character in Dhulai : Accused husband arrested धुळे : चारीत्र्याच्या संशयातून धुळ्यातील यशवंत नगर भागात पत्नीची पतीने धारदार हत्यार मारून हत्या केली होती. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत दीपाली नागेश कानडे (28) या विवाहितेचा करुण अंत झाला तर या प्रकरणी आरोपी नागेश दगडू कानडे (35) याच्याविरोधात धुळे शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केले असता 31 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

चारीत्र्याच्या संशयातून विवाहितेचा खून
सुमारे आठ वर्षापूर्वी दाम्पत्याने आंतरजातीय प्रेम विवाह केला होता व यशवंत नगर भागात दाम्पत्य वास्तव्यास होते. आरोपी पती हा पत्नीच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेत असल्याने त्यातून दाम्पत्यात खटकेही उडत होते. शनिवारीदेखील दाम्पत्यात वाद झाल्यानंतर नागेशने दीपालीला मारहाण केली व धारदार शस्त्र तिच्या डोक्यात मारल्याने ती गंभीर जखमी झाली. दीपालीचा जेठ गणेश दगडू कानडे यांनी तिला रक्तबंबाळ अवस्थेत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. संशयीत आरोपी तथा डीजे चालक नागेश कानडे यास अटक करण्यात आली असून त्यास रविवारी न्यायालयाने 31 पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली. तपास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व सहकारी करीत आहेत.


कॉपी करू नका.