साकेगावातील पिता-पूत्रास मारहाण : एकाविरोधात गुन्हा
Beating father and son in Sakegaon: Crime against one भुसावळ : बर्फीचे पैसे मागितल्याच्या कारणातून साकेगाव येथील पिता-पूत्राला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाणीत दोघे जखमी
टपरी व्यावसायीक गोविंदा मना तायडे (69, साकेगाव) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत राहुल राजू सपकाळे (साकेगाव) यांच्याकडे शुक्रवारी दुपारी अडीच वाजता बर्फीचे पैसे मागितल्यानंतर आरोपीला राग आल्याने त्याने लाकडी फावड्याच्या दांड्याने डाव्या हातावर मारून दुखापत केली तसेच मुलगा नितीन गोविंदा तायडे यासदेखील दारूच्या नशेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.








