चाळीसगाव तालुक्यात धाडसी घरफोडी


चाळीसगाव : तालुक्यातील पिंप्री बु. प्र.चा येथे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साीत रोकडसह 70 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची संधी पथ्थ्यावर
चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री बु. प्र.चा येथे विद्याबाई गोरख मोरे (45) या शेती व्यवसाय करून चरीतार्थ चालवतात. विद्याबाई या बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांंनी 24 ते 28 जानेवारीदरम्यान साधली. घराचा कडीकोंडा तोडून लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत व 20 हजारांची रोकडून मिळून 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात विद्याबाई गोरख मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक प्रवीण संगीले करीत आहेत.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !