यावल शिवारातून दहा हजार रुपये किंमतीच्या केळीच्या झाडांची चोरी
Theft of banana trees worth ten thousand rupees from Yawal Shiwar यावल : शहरातील शेतकर्याच्या यावल शिवारातील शेतामधून तब्बल साडेतीन क्विंटल केळीचे झाड अज्ञात चोरट्याने कापून नेले. या करणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरटे पुन्हा सक्रिय
यावल शहरातील महाजन गल्लीतील रहिवासी शेतकरी सुनील लक्ष्मण फेगडे यांचे शेत यावल शेत शिवारात आहे. त्यांच्या शेत गट क्रमांक 285 मध्ये त्यांनी केळीची लागवड केली होती व आता केळी कापणी योग्य झाली असताना चोरट्यांनी सुमारे 20 केळीचे झाड कापून चोरी केले. हा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर शेतकरी सुनील फेगडे यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेेत.








