वड्री येथील जिल्हा परीषद शाळेतून एलईडी टीव्ही लांबवला
LED TV extended from Zilla Parishad School in Vadri यावल : तालुक्यातील वड्री येथील जिल्हा परीषद शाळेतून चोरट्यांनी 40 इंची एलईडी स्मार्ट टीव्ही लांबवला. या प्रकरणी मुख्याध्यापकांनी यावल पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली आहे.
यावल पोलिसात तक्रार
वड्री येथील जिल्हा परीषद शाळेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 20 हजार रुपये किंमतीचा 40 इंची एलईडी स्मार्ट टीव्ही देण्यात आला होता. विद्यार्थ्यांना ऑनलाइनचे शिक्षण देण्यासाठी हा स्मार्ट टीव्ही इसलातरी अज्ञात भामट्याने शाळेच्या वर्गाच्या दरवाज्याची कडी कोंडा तोडून तो लांबवला. मुख्याध्यापक फकीरा तडवी यांच्या निर्दशनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सरपंच अजय भालेराव यांना कल्पना दिल्यानंतर यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली.








