अंतुर्लीतील शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग
School girl molested in Anturli मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली येथील 17 वर्षीय अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी निलेश उर्फ भूरा बंडू ठोंबरे (अंतुर्ली) विरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी 6.28 वाजेच्या सुमारास घडली.
रस्ता अडवत केला विनयभंग
पीडीत तरुणी ही आपल्या आत्याकडे पायी निघाल्यानंतर आरोपीने दुचाकीवरून पाठलाग करीत विनयभंग केला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.








