यावल एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातून मोबाईल चोरी


Mobile theft from Yawal Integrated Child Development Project office यावल : शहरातील एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयातून मोबाईल लांबवल्याप्रकरणी यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
यावल बसस्थानकासमोरील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात दुमजली इमारतीत वरील मजल्यावर एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय आहे. या कार्यालयातील महिला कर्मचारी कल्पना पितांबर तायडे यांनी आपला 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कर्मचार्‍याला इंटरनेटसाठी वायफाय देण्यासाठी दिला होता व संबंधित कर्मचारी हे संगणकावर इंटरनेट जोडणी करून काम करत होते. काम सुरू असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने संधी साधली. यावल पोलीस ठाण्यात कल्पना तायडे यांनी तक्रार नोंदवली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !