MPDA on a notorious criminal in Chalisgaon चाळीसगावातील कुविख्यात गुन्हेगारावर एमपीडीए
MPDA on a notorious criminal in Chalisgaon चाळीसगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलीस दप्तरी कुविख्यात म्हणून ओळख असलेल्या शहरातील निखील उर्फ भोला सुनील अजबे (21, नारायणवाडी ,चाळीसगाव ) याच्याविरोधात जळगाव जिल्हाधिकार्यांनी एमपीडीएची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. अलीकडेच चाळीसगावातील 11 जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मोक्काची कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकावर स्थानबद्धतेची कारवाई झाल्याने गुन्हेगारांनी कारवाईचा धसका घेतला आहे.
आगामी निवडणुकांसाठी पोलिसांचे नियोजन
आगामी काळात होणार्या निवडणुका व विविध जाती-धर्माचे सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहे. चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील व चाळीसगावचे निरीक्षक के.के.पाटील, विनोद भोई, तुकाराम चव्हाण आदींनी संशयीतांविरोधात स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर केला. प्रस्तावावर सुनावली होवून सोमवार, 30 जानेवारी रोजी संशयीतास स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहेत.






संशयीताची अमरावती कारागृहात रवानगी
जिल्हाधिकार्यांनी आदेश पारीत करताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सहा.निरीक्षक सागर ढिकले, अमित बाविस्कर, अमोल भोसले, रवींद्र वच्छे, दामोदर यांच्या पथकाने संशयीत निखील अजबे यास ताब्यात घेत त्याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.


