भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केले कलाविष्कार


भुसावळ : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलचे स्नेहसंमेलन मंगळवारी उत्साहात पार पडले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले तसेच चित्तथरारक कसरतीही सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली.

यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल पवन कुमार व पोलीस अधीक्षक एम.राजकुमार होते. बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, अभियंता रोनक बियाणी, पियुष बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी, गोपाळ ठाकूर, राजेश पारीख, प्रवीण भराडीया, आर.के पाटील व प्राचार्य डी.एम.पाटील, कांचन जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पवन कुमार यांनी द्वीपप्रज्वलन करून व सरस्वती पूजन तसेच बी.सी.बियाणी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले.

विद्यार्थ्यांनी सादर केले नृत्याविष्कार
यावेळी मिलिटरी स्कूल मधील एक हजार विद्यार्थ्यानी विविध गाण्यावर नृत्य सादर करून कलाविष्कार सादर केले. जिद्द, चिकाटी व मेहनत घेवून अभ्यास करावा व गाव, शहरासह देशाचेही नव उज्वल करावे, असे आवाहन अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनप्रसंंगी केले. सूत्रसंचालन प्रिन्सिपल डी.एम.पाटील यांनी तर आभार डॉ.संगीता बियाणी यांनी मानले.


कॉपी करू नका.