भुसावळात विभागात राष्ट्रपती महात्मा गांधींना अभिवादन


भुसावळ : शहर व परीसरात राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी प्रतिमा पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

भुसावळ शहर महिला काँग्रेसतर्फे महात्मा गांधींना अभिवादन
भुसावळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भुसावळ शहर महिला काँग्रेसतर्फे यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील उर्फ बंटी भैया पाटील. भुसावळ शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष ईस्माईल पैलवान गवळी, भुसावळ शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदा आवटे, माजी नगरसेवक रमजान ठेकेदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव सुनील जवरे, शैला सावंत आदींची उपस्थिती होती.

मुक्ताईनगरात खडसे महाविद्यालयात हुतात्मा दिन
मुक्ताईनगर : शहरातील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हेमंत महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभागाचे प्रा.दत्तात्रय कोळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील, ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा.सरोदे, भूगोल विभाग प्रमुख प्रा.लढे, पदार्थ विज्ञान शास्त्राचे विभाग प्रमुख प्रा.शंकर पाटील, प्रा.गवळी, प्रा.पंडित चौधरी, प्रा.सविता बढे, प्रा.छाया खर्चे, प्रा.डॉ.छाया ठिंगळे व राजू जुमळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजीव साळवे, प्रा.डॉ.प्रतिभा ढाके, एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.दीपक बावस्कर व प्रा.डॉ.ताहिरा मीर यांनी केले. सूत्रसंचालन चेतन मोरे तर प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.विजय डांगे यांनी केले तर आभार भाग्यश्री भोळे हिने मानले.

ऐनपूर येथे महात्मा गांधी यांना अभिवादन
रावेर : तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग मार्फत महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने, डॉ.डी.बी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. व्ही.एन.रामटेके यांनी केले. अभिवादन सभेला विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आभार डॉ.व्ही.एन.रामटेके यांनी मानले.

भुसावळ शहर काँग्रेस कमेटी
भुसावळ : भुसावळ शहर काँग्रेस कमेटीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहराध्यक्ष रवींद्र निकम, सेवा दलाचे अध्यक्ष संजय खडसे यांनी रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम भजन म्हटले. शहर काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष संतोष साळवे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळयास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर सरचिटणीस सलीम गवळी, शहर उपाध्यक्ष हमीद शेख, रमजान खाटिक, राम अवतार परदेशी, महेंद्र महाले, फातिमा तडवी, शहर सरचिटणीस संघटन शैलेश अहिरे, जिल्हा एस.सी.विभाग अध्यक्ष अ‍ॅड.कैलास शेळके, जिल्हा घरेलु कामगार अध्यक्ष राजेश डोंगरदिवे, अतुल पानपाटील आदींची उपस्थिती होती


कॉपी करू नका.