भुसावळातील नगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये ओपन जीम हवी

मुस्लिम मंच भुसावळतर्फे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना साकडे


भुसावळ : शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या आवारात ओपन जीम तयार करावी, अशी मागणी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार तसेच प्रांताधिकारी व प्रशासक रामसिंग सुलाणे यांच्याकडे मुस्लीम मंचतर्फे करण्यात आली. निवेदनाचा आशय असा की, मोहम्मद अली रोड रजा टॉवरजवळ उर्दू शाळा क्रमांक 20, 21, 22 व 25 मध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांचा शारीरीक विकास होण्यासाठी तसेच या भागातील नागरीकांचे स्वास्थ सुदृढ राहण्यासाठी ओपन जीम तयार केल्यास सोयीचे होणार आहे.

निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देताना मुस्लिम मंच भुसावळ अध्यक्ष साबीर शेख, मुजाहिद शेख, जुनेद अश्रफ, युनूस मामा, नजर शेख, साजीद बागवान, सलीम गवली, साजीद रोशन आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.