भुसावळात शुक्रवारपासून खान्देश नाट्यमहोत्सवाचे आयोजन

दोन बालनाट्यासह चार नाटकांची मेजवानी


Khandesh Theater Festival organized in Bhusawal from Friday भुसावळ : शहरातील उत्कर्ष कलाविष्कार संस्थेतर्फे नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सव (प्रायोगिक) येत्या शुक्रवार, 3 फेब्रुवारी सुरु होत आहे. तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवात दोन बालनाट्ये व चार मोठी नाटके अशी एकूण सहा नाटके सादर केली जाणार आहे.

एकूण सहा नाटकांचे सादरीकरण
संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाट्यकर्मी अनिल कोष्टी यांनी महोत्सवाची माहिती देतांना सांगितले की, महोत्सवाचे आयोजन रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात करण्यात आले आहे. महोत्सवात सहा नाटके सादर होणार असून महोत्सवाचे हे अकरावे वर्ष आहे. गेल्या दहा वर्षापासून खानदेश नाट्य महोत्सवात जवळपास 75 नाटकांनी आपले सादरीकरण केले आहे. यावर्षी नाट्य महोत्सव महोत्सवात मुंबई, रत्नागिरी, पुणे, जळगाव, भुसावळ येथील दर्जेदार नाटकांची मेजवानी मिळणार आहे.







पहिल्या सत्रात दोन बालनाट्य
नाट्यमहोत्सवाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे महोत्सवात पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता दोन बालनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहेत. ही बालनाट्य शालेय विद्यार्थ्यांना पाहायला मिळावी म्हणून संस्थेतर्फे सर्व शाळांना मोफत पास वाटण्यात आले आहे. नाट्यमहोत्सव सर्व रसिकांसाठी निःशुल्क असून कोणतेही तिकीट लावण्यात आलेले नाही. या नाट्य महोत्सवाचा अधिकाधिक रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन उत्कर्ष कलाविष्कार तर्फे करण्यात आले आहे. शनिवार, 4 रोजी सादर होणारे पुणे निर्मित नाटक स्वर्गीय पांडुरंग रतीलाल महाजन यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले असल्याची माहिती अनिल कोष्टी यांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !