किनगावात जुना वाद उफाळला : एकाला सहा संशयीतांची मारहाण
An old dispute erupted in Kingaon : Six suspects beat each other up यावल : तालुक्यातील किनगाव खुर्द या गावात मागील भांडणाच्या कारणावरून एकाला त्याच्या घरात जाऊन सहा जणांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सहा संशयीतांविरोधात दंगलीचा गुन्हा
किनगाव खुर्द, ता.यावल येथील भूषण नंदन पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाच्या कारणावरून त्यांचे मामेभाऊ मयूर विठ्ठल बोरसे याला जितेंद्र दिलीप कोळी, गणेश नारायण कोळी, लाल्या सत्यवान कोळी, जीवन प्यारेलाल कोळी, प्रफुल शालिक पाटील व लोकेश ईश्वर कोळी (सर्व रा. किनगाव खुर्द) या सर्वांनी जबर मारहाण केली तसेच गळा दाबून छातीवर, डोक्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. भूषण नंदन पाटील यांनी संशयीताच्या तावडीतून मयुर बोरसे यास सोडवले.








