सातबारा उतार्‍यासाठी मागितली लाच : साकरीतील महिला तलाठ्यांची जामिनावर सुटका


Bribe demanded for Satbara passage : Sakari female Talathi released on bail भुसावळ : सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी 300 रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या साकरी व खडका गावातील महिला तलाठी मनीषा निलेश गायकवाड यांना जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली होती. गायकवाड यांना बुधवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची 15 हजारांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली.

कार्यालयातच स्वीकारली लाच
भुसावळातील 34 वर्षीय तक्रारदाराने सजा खडका हद्दीमध्ये प्लॉट खरेदी केला असून प्लॉटच्या इंडेक्स -2 व खरेदीखत घेऊन 7/12 उतार्‍यावर नाव लावण्यासाठी गायकवाड यांनी तीनशे रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला व मंगळवारी दुपारी तीन वाजता खडका गावातील तलाठी कार्यालयात लाच स्वीकारताच गायकवाड यांना अटक करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्यातर्फे अ‍ॅड.मनीष सेवलानी व अ‍ॅड. तुषार पाटील यांनी बाजू मांडली. तपास पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.