चाळीसगावात धावत्या रेल्वे गाडीला पकडताना तरुणाचा तोल सुटला मात्र देवदूत म्हणून पोलीस धावले अन बचावला जीव


Due to the alert Lohmarg Police in Chalisgaon, the young man got his life चाळीसगाव : लोहमार्ग पोलीस कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर एका तरुणाचा जीव वाचला. 1 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दीपक दाजी पवार (शिरपूर) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. लोहमार्गचे उपनिरीक्षक उपनिरीक्षक शब्बीर शेख, चंद्रशेखर भावसार, जितेंद्र वाघ, राहुल शार्दुल यांचे यांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

कर्मचार्‍यांच्या सतर्कतेने वाचले प्राण
मंगळवारी चाळीसगाव स्थानकावर सायंकाळी 5.27 वाजता डॉउन पवन एक्स्प्रेस आल्यानंतर प्रवासी दीपक पवार याने धावत्या रेल्वेला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र हात निसटल्याने अघटीत घटना घडण्यापूर्वीच रेल्वे पोलिसांनी तरुणाला गाडीपासून ओढत त्याचे प्राण वाचवले. या घटनेत दोन कर्मचार्‍यांना किरकोळ ईजादेखील झाली. नाशिक ते जळगाव प्रवासाचे जनरल तिकीट या तरुणाकडे आढळले असून त्यास नंतर सचखंड एक्स्प्रेसने रवाना करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !