चाळीसगावातील डॉक्टरांच्या दवाखान्यातून 60 हजारांचा ऐवज लांबवला


A compensation of 60 thousand was extended from the doctor’s clinic in Chalisgaon चाळीसगाव : शहरातील रहिवासी व तालुक्यातील तरवाडे येथील खाजगी दवाखाना टाकून उदरनिर्वाह करणार्‍या डॉक्टरांच्या दवाखान्यातून चोरट्यांनी 50 हजारांच्या रोकडसह 60 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा मोर्चा दवाखान्याकडे
शहरातील पवारवाडी येथील डॉ.केतन गोरख वाघ (35) यांचा तरवाडे गावातील साईबाबा मंदिराजवळ ध्वन्वंतरी क्लिनीक नामक दवाखाना आहे. चोरट्यांनी दवाखान्याच्या दरवाजाचे कडीकोंडा तोडून आठ हजारांचे लॅपटॉप, दोन हजारांचा मोबाईल व 50 हजार रुपये रोख असे एकूण 60 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार 31 जानेवारी रात्री 8.30 ते गुरुवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान घडला. वाघ यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत सपकाळे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !