दोन कोटींची प्रॉपर्टी परस्पर विकण्यापूर्वी गुन्हे शाखेने उधळला डाव : महिलेसह त्रिकूट जाळ्यात


Crime branch busted a plot before selling property worth 2 crores to each other : Threesome with woman in the net

जळगाव : सुमारे दोन कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची मूळ मालकाच्या संमतीविनाच डमी ग्राहक उभा करून विक्री करण्याचा डाव जळगाव गुन्हे शाखेने उधळला आहे. या कारवाईत महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी अशाच पद्धत्तीने काही मालमत्ताधारकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. आरोपींविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बखळ प्लॉटच्या विक्रीचा डाव उधळला
जळगाव शहरातील आयोध्या नगरातील बखळ प्लॉट हा अनिता राजेंद्र नेहते यांच्या नावे असून सध्या त्या कामानिमित्त बाहेरगावी राहतात. त्यांच्या ऐवजी बनावट महिला उभी करून त्यांच्या नावे असलेला दोन कोटी रुपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याचा प्लॅन आरोपींनी तयार केला. याबाबत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

संशयीत जाळ्यात अडकताच समोर आला प्लॅन
हवालदार विजयसिंह पाटील, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, मोतीलाल चौधरी आदींनी ऑटोनगरातील संदीप हॉटेलजवळून संशयीत आरोपी राजू जगदेव बोबडे (42, विटनेर, ता.जि.जळगाव) यास ताब्यात घेतले. आरोपीवर यापूर्वीच पोलिसात गुन्हे दाखल असून चौकशीअंती असता त्याने प्रमोद वसंत पाटील (46, विरावली, ता.यावल) आणि गंगा नारायण जाधव (42, अयोध्या नगर, जळगाव) यांच्या संमतीने बखळ प्लॉट विक्री करीत असल्याची कबुली दिली.

बाहेरगावी राहणार्‍या मालमत्ता धारकांची कमी किंमतीत विक्री
कामानिमित्त बाहेर गावी राहणार्‍या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्या नावावर किती पॉपर्टी आहे ? याची चौकशी करून बनावट व डमी मालक व मालकीन उभे करून त्याच मालमत्ता धारकाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून कमी किंमतीत विक्री करीत असल्याची कबुली आारोपींनी दिली आहे. याच पध्दतीने आरोपींनी अयोध्या नगरातील अनिता राजेंद्र नेहते यांचे दोन कोटी रुपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिल्याने मोठा गैरप्रकार पोलिसांच्या सतर्कतेने टळला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार संजय भांडारकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील बडगुजर, रतन गीते, रवींद्र सोनार करीत आहेत.


कॉपी करू नका.